भजनी मालिका
← भजनांकडे परत

वायांची आयुष्य जातसे खरें । उपाय तो बरें हरी एक

vayanchi ayushya jatase kharen | upay to baren hari ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वायांची आयुष्य जातसे खरें । उपाय तो बरें हरी एक ॥१॥ अवघा वेळ अवघा काळ । नका पोकळ घालवुं ॥२॥ जे जे घडी जे जे वेळीं । करा कल्लोळीं हरिकथा ॥३॥ शरण एका जनार्दनीं । भजा अनुदिनें संतासीं ॥४॥