भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारकरी संत पंढरीसी जाती । सप्रेमें नामघोषें

varakari sant pandharisi jati | sapremen namaghoshen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वारकरी संत पंढरीसी जाती । सप्रेमें नामघोषें ॥१॥ लोटांगणी त्यांसी जाईन आवडी । ओवांळीन कुडी वरुनी पायां ॥२॥ धन्य केल वंश तारिले पातकी । डोलतां पताकी गगन शोभे ॥३॥ टाळ श्रुति वादयें मृदंगाच्या ध्वनी । क्रमिताती अवनी ब्रम्हानंदें ॥४॥ पढती ब्रिदावळी करिती जयजयकार । टाळीया अंबर सादु देत ॥५॥ निळा म्हणे माझे सखे विष्णुदास । जाती पंढरीस प्रतिवरुषीं ॥६॥