भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा

varanvar tuj dyavaya athav | aik to bhav majha kaisa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा॥१॥ गेला मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥ गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥२॥ कांहीं एक तुझा न देखों आधार । म्हणऊनी धीर नाहीं जीवा ॥३॥ तुका म्हणे तूं ब्रम्हांडाचा जीव । तरी कां आम्ही कींव भाकीतसों ॥४॥