भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारंवार देही हेचिं पैं वासना । अखंड चरणा घालीन मिठी

varanvar dehi hechin pain vasana | akhand charana ghalin mithi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वारंवार देही हेचिं पैं वासना । अखंड चरणा घालीन मिठी ॥१॥ हा माझा नवस आठवीन पाय । आणिक तें कांहीं नेणें दुजें ॥२॥ संअल्पासी कैं येईल । कैं धीरा धीर होईल मन ॥३॥ एक जनार्दनीं अखंड वासना । पुरवा नारायणा देउनी भेटी ॥४॥