भजनी मालिका

भजने

वटेश्वरें वृत्तान्त सांगितला सकळ । पूर्वीं आमुचें स्थळ याच क्षेत्रीं ॥१॥ येथूनियां वाट जातसे पाताळा । उघडिली शिळा समाधीची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वडील कुरंगी काय बोले त्यासी । सांगतें धर्मासी पूर्वीलीया ॥१॥ बांधोनी मारितां घडे महादोष । पाजी उदकास सोडोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वडील धाकुली ऐशा दोन जाया । संतान तें तया नसे काहीं ॥१॥ वडील पट्टराणी ममता तिजवरी । धाकुलीस अव्हेरी क्षणक्षणां २॥

रचनाकार: संत एकनाथ

वडील वडील आमुची बोलतील गोष्टी । परी तुज ऐसा सृष्टीं देव नाहीं ॥१॥ दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा । मन मारूनी चोहाटा भुलविसी तूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वडील वडील आमुची बोलतील गोष्टी परी तुज ऐसा सुटी देव नाहीं।।१।। दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा मन मारूनी चोहाटा भुलविसी तूं ||२||

रचनाकार: संत गोणाई

वणिंतां चरित्रे न पुरे धणी । वाचा लांचावली हरीच्या गुणीं । स्वानंदाची उघडली खाणी । नामस्मरणीं मातली ॥१॥ अधिक् अधिक् स्फूर्तीचा प्रसर । आगळीं अक्षरें चालती फार । नेणों फुटलें हें चिदांबर । मेघवृष्टिन्यायें होतसें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥१॥ शिकविलें काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वत्साकारणें मोहाळु गाये । अनुसरलेया पान्हा ये ॥१॥ तैसें तुझें वासरूं बांधलों मी असें । मज लावे कांसे आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वत्सालागीं गोप धाउनी वारसे । तैसें असो पिसें देवा ठायां ॥१॥ पाडसां चुकलीं हरीण पाहे वास । तैसी धरा आस देवा ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वत्सें वत्सप वनांतरी । माजी परमात्मा श्रीहरी । खेळतां खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला ॥१॥ सांगतां अंगीची बारव । मृणालिके ऐसी लव । शृंगे सुवर्णाची ठेव । रत्नापरी नयन दोन्ही ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वदतां वदनीं अहर्निशीं राम । उपदेश सुगम सोपा मंत्र ॥१॥ दो अक्षरीं राम तेणें जोडे धाम । आणिक तो श्रम वायां जाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वदन निमासुरें कटांवरीं कर । उभा विटेवरीं पुंडलिका समोर । चरणीं ब्रीदावळी रुळती असूर । वरी वाळे वांकी रुणझुणिती मधुर वो ॥१॥ तेणें नवलचि केलें वो साजणी । सहज अवलोकितां संचारला नयनीं । त्याविण न दिसेचि दुजें जनीं वनीं । जें जें दिसे तें तें हाचि भासे मनीं वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वदनीं तुझें नाम अमृत संजीवनी । असतां चक्रपाणि भय कवण ॥१॥ या जन्ममरणाची कायसी मग चिंता । तुझिया शरणागता पंढरीनाथा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पे संतां समर्पीशी ॥१॥ सर्वसंकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम