भजनी मालिका
← भजनांकडे परत

वत्सें वत्सप वनांतरी । माजी परमात्मा श्रीहरी । खेळतां खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला

vatsen vatsap vanantari | maji paramatma shrihari | khelatan khel nanapari | pudhen dhenuk dekhila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वत्सें वत्सप वनांतरी । माजी परमात्मा श्रीहरी । खेळतां खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला ॥१॥ सांगतां अंगीची बारव । मृणालिके ऐसी लव । शृंगे सुवर्णाची ठेव । रत्नापरी नयन दोन्ही ॥२॥ कर्णं जैसीं केतकी दळें । अती राजस पादतळें । खुर शोभति रातोत्पळें । जेवी जडूनि ठेविलीं ॥३॥ चारी चरण कर्दळीस्ताभ । हदयावकाशीं सूक्ष्म नभ । पाठीवरी त्रिवेणी भांव । पुच्छा स्वयंभ शेषफणी ॥४॥ कांबळी लोंबे कंठातळीं । विधुत्प्राय टिळकू भाळीं । वोसंड लवथवित्‍ मांस मोळीं । देखतां नव्हाळी डोळियां ॥५॥ गोंवळ म्हणती कृष्णा पोहें छ नवल वृष्थ आला आहे । चुकारिचाचि नवल नाहे । न्यावा धरुनि मंदिरा ॥६॥ निळा म्हणे ऐकोनि हरी । दृष्टी घालोनियां सामोरी । म्हणे धेनुक हा निर्धारी आलासे मुक्ति मागावया ॥७॥