भजनी मालिका
← भजनांकडे परत

वडील धाकुली ऐशा दोन जाया । संतान तें तया नसे काहीं

vadil dhakuli aisha don jaya | santan ten taya nase kahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वडील धाकुली ऐशा दोन जाया । संतान तें तया नसे काहीं ॥१॥ वडील पट्टराणी ममता तिजवरी । धाकुलीस अव्हेरी क्षणक्षणां २॥ ऐसा कांही काळ लोटलियावरी । धाकुलीस निर्धारीं पुत्र जाहला ॥३॥ तयाचें तें नाम ध्रुव पैं ठेविलें । एका जनार्दनीं जाहलें नवल तेथें ॥४॥