भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदन निमासुरें कटांवरीं कर । उभा विटेवरीं पुंडलिका समोर । चरणीं ब्रीदावळी रुळती असूर । वरी वाळे वांकी रुणझुणिती मधुर वो

vadan nimasuren katanvarin kar | ubha vitevarin pundalika samor | charanin bridavali rulati asur | vari vale vanki runajhuniti madhur vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वदन निमासुरें कटांवरीं कर । उभा विटेवरीं पुंडलिका समोर । चरणीं ब्रीदावळी रुळती असूर । वरी वाळे वांकी रुणझुणिती मधुर वो ॥१॥ तेणें नवलचि केलें वो साजणी । सहज अवलोकितां संचारला नयनीं । त्याविण न दिसेचि दुजें जनीं वनीं । जें जें दिसे तें तें हाचि भासे मनीं वो ॥२॥ कांसे कसिला वो मिरवें सोनसळा । कटीं कटिसूत्र जडित मेखळा । उदरीं त्रिवळीं वों तुळसी वनमाळा । कौस्तुभ पदकें व्दिजचरणांकुश सोज्ज्वळा ॥३॥ मुखमयंक पूर्णाशें उगवला । भक्त चकोरासी अमृतें वंरुषला । दंत हिरयाचा प्रकाश फांकला । अधर सोज्जवळ वो नासाग्र सरळा वो ॥४॥ निडळीं रेखिलें वो केशर झळके । श्रवणीं कुंडलाचें तेज फांके । नयनीं सुतेज विदयुल्लता चमके । माथां मुगुटावरी मयूरपिच्छा स्तवकें वो ॥५॥ सुंदर साजिरें वो स्वरुप ठाणमाण । तेणें आकर्षिलें माझे पंचप्राण । नावडे आणिक वो त्याचीच मज आण । निळा म्हणे मी माझें याची झाली बोळवण वो ॥६॥