भजनी मालिका
← भजनांकडे परत

वत्साचिये माय कपिला सांगातें

vatsachiye may kapila sangaten

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
वत्साचिये माय कपिला सांगातें । धांवे एकचित्तें आम्हांपुढें ॥ १ ॥ मायबाप बंधु भ्रतारासहित । इंद्रायणी जेथ तेथें आलों ॥ २ ॥ करोनीया स्नान पांडुरंगभेटी । आनंदली सृष्टी अंतरंगें ॥ ३ ॥ तुकोबा आरती करीत होते तेथ । नमस्कारें स्वस्थ चित्त केलें ॥ ४ ॥ स्वप्नीं जो देखिला तेंच ध्यान तेथें । देखिलें नेमस्त पूर्ण दृष्टी ॥ ५ ॥ बहिणी म्हणे तेथ भ्रतारें साष्टांग । केला अंतरंग भावयुक्त ॥ ६ ॥