भजनी मालिका
← भजनांकडे परत

वत्साकारणें मोहाळु गाये । अनुसरलेया पान्हा ये

vatsakaranen mohalu gaye | anusaraleya panha ye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वत्साकारणें मोहाळु गाये । अनुसरलेया पान्हा ये ॥१॥ तैसें तुझें वासरूं बांधलों मी असें । मज लावे कांसे आपुलिया ॥२॥ मज बांधलें त्वां संसारखुंटीं । माझी माउली दूर वैकुंठीं ॥३॥ थोरूं करी मना लाहो । तंव आणिकें नेती पान्हावो ॥४॥ धीरू नव्हे याचि परि । नामा विनवितसे मुरारी ॥५॥