भजनी मालिका
← भजनांकडे परत

वडील वडील आमुची बोलतील गोष्टी परी तुज ऐसा सुटी देव नाहीं

vadil vadil amuchi bolatil goshti pari tuj aisa suti dev nahin

रचनाकार: संत गोणाई · अभंग
वडील वडील आमुची बोलतील गोष्टी परी तुज ऐसा सुटी देव नाहीं।।१।। दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा मन मारूनी चोहाटा भुलविसी तूं ||२|| ऐसा कैसा कोणें केला देव आमुच्या जाणिवा खेच आणिवेला ||३|| माझे बाळ तुझ्या दर्शनास आलें । तें त्वां भुलविलें केशिराजा ||४|| रात्रिदिवस तुझ्या नामाचा रे छंदु । गोविंद गोविंद म्हणतसे ।।५।। तान्ह भूक विसरला पिसाट पैं जाला। नोळखे मजला काय करूं ॥ ६॥ परतोनि संसाराची सांडियेली आस दिसतो उदास सर्वापरी ।।७॥ लोकांचीं लेंकुरें कां गा चाळविसी । आपणया ऐसें करसी भलत्यासी।।८।। आणिक असतां नाश वेगळा थोर मग माझा विचार कळतां तुज||९|| तुम एक धर्म पुंडलिक आहे जेणें जहविले पाय विटेवरी ।।१०।। याहुनी आणिक अधिक पावसी। आम्हां दुबळ्यासी कष्टवितां ।। ११ ।। मार्गे पुढे तुज ऐसेंचि फावलें । तें तंव न चले मजसी कांहीं ।। १२ ।। जीव मी देईन कां नामा नेईन। नांव मी करिन गोतामाजीं ।।१३।। आतां बरवें विचारी अगा ये श्रीहरी । माझा नामा करीं मज आधीन ।। १४ ।। नाहीं तरी जीवित्व वेंचिन तुझ्या पायीं । विनविते गोणाई केशिराजा ।। १५ ।।