भजनी मालिका

भजने

वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥ हरी बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वरपांग सोंग नको माळा मुदी । ठाव संतपदी देई देवा ॥१॥ प्रेमभाव देई प्रेमभाव देई । मागणें दुजें नाहीं आणिक तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वराईची गोणी कळली राजाईसी । नामा ब्राह्मणांसी बोलाविती ॥१॥ इतक्यामध्यें होन मडकेंभर काढिले । गोणी ते शिविली होती तैसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वता थेंब नाहीं ॥१॥ वायां तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्तिविण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वर्णावया रूप कांहीं स्फुर्ती देईं । नरसिंह तूं होई साह्यभूत ॥१॥ मुख तें सिंहाचें शरीर मानवाचें । भयंकर देवाचें रूप असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वर्णावी ती थोरी एका सदगुरुची । येरा मानवाची कामा नये ॥१॥ सदगुरु समर्थ कृपेचा सागर । मनी वारंवार आठवावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥ उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम