वदवी असत्याची वाणी । माजी निंदेची पुरवणी
vadavi asatyachi vani | maji nindechi puravani
वदवी असत्याची वाणी । माजी निंदेची पुरवणी ॥१॥ जळो जळो त्याचें तोंड । पचतें पापाचेंचि कुंड ॥२॥
vadavi asatyachi vani | maji nindechi puravani
वदवी असत्याची वाणी । माजी निंदेची पुरवणी ॥१॥ जळो जळो त्याचें तोंड । पचतें पापाचेंचि कुंड ॥२॥
vandave kavanasi nindaven kavanasi | limpaven gaganasi kavan limpi
वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥ १ ॥ नाहीं जया रूप नाहीं जया ठाव । तेंचि व्यालें सर्व सांगतसे ॥ २ ॥
vandaven ten kay nindaven ten kay | sarvanthayin pahen kon-datalen
वंदावें तें काय निंदावें तें काय । सर्वांठायीं पाहें कों-दाटलें ॥१॥ आहे कवणा ठायीं नाहीं कवणा ठायीं । ठायींच्या पैं ठायीं कोंदाटलें ॥२॥
vandili ambika nighale baher | kirtan gajar pudhen hot
वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होत ॥१॥ गोदातीरीं क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । उतरले भार वैष्णंबांअचे ॥२॥
vandilen vandaven jivachiye sathi | kinva bari tuti arambhin cha
वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥१॥ स्वहिताची चाड ते ऐका बोल । अवघेंचि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥
vandin mi bhuten | atan avaghin chi samasten
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥ तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥
vandun abhavik jan | aikavenk sadhan pavan | kaliyugin adnyan | abhavik pain hoti
वंदुं अभाविक जन । ऐकावेंक साधन पावन । कलियुगीं अज्ञान । अभाविक पैं होती ॥१॥ न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । ज्ञान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिलें ॥२॥
vadunin shrigurucharan | santamahima varnu dhyan
वदुनीं श्रीगुरुचरण । संतमहिमा वर्णु ध्यान ॥१॥ आदिनाथगुरु । तयापासोनी विस्तारु ॥२॥
vanduni tukaya sadguruchen charan | bahamanande garjoni purna | svanubhavabharen hankarun | aushadh ghya ghya mhanatuse
वंदूनि तुकया सद्गुरुचें चरण । बहमानंदे गर्जोनि पूर्ण । स्वानुभवभरें हांकारुन । औषध घ्या घ्या म्हणतुसे ॥१॥ निजात्मनगरीहुनी धडफुडा । वैदय आलों गा या तुमच्या चाडा ॥ तोडीन नाना व्याधींचा झगडा । करीन रोकडा अमरा ऐसा ॥२॥
vanden tun achyut sarvakal sada | mayapash bandh tutoni jay
वंदें तूं अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि जाय ॥१॥ करी कां रे नेम धरीं का रे प्रेम । अच्युताचें नाम वंदे सदा ॥२॥
vade tochi kalpit shastra ten shabdik | purana sakalik bashkalachi
वदे तोचि कल्पित शास्त्र तें शाब्दिक । पुराणा सकळिक बाष्कळचि ॥१॥ बाहुली तो जीव सुत्रधारी तो शिव । मिथ्याचि हे भाव जग सर्व ॥२॥
vade vani pari durlabh anubhav | chalicha chi vaho bahutek
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥ आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंकितसे ॥ध्रु.॥
vade sakshatvensin vani | narayanin mishrit
वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥ न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥
van vruksha valli ishvarasaman | rushi munijan rahati jethen
वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान । ऋषि मुनिजन राहाती जेथें ॥१॥ होऊनियां पक्षी कपोद कोकिळा । वेष्टियेलें स्थळा ब्रह्मबोधें ॥२॥
vanamajin neti gopika tayasin | ram krida khelavayasi ekanti
वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥ जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥
vanamadhyen kange alanti sakal | vinodem gopal hmanatati
वनामध्यें कांगे आलांती सकळ । विनोदेम गोपाळ ह्मणताती ॥१॥ निशींमाजीं व्याघ्र फिरताती रानीं । जावें सक-ळांनीं घरां आतां ॥२॥
vanhadi ale sansar nagara
वन्हाडी आले संसार नगरा । चांगा नोवरा केळवला ॥१॥
vamilya mishtanna | paratoi shraddha na dhari rasana
वमिल्या मिष्टान्ना । परतोई श्रद्धा न धरी रसना ॥१॥ ऐसे आठवितां माझे गुण । मिथ्या ठायीं नसें ज्ञान ॥२॥
vay thoden thakena tirthatan
वय थोडें ठाकेना तीर्थाटन । बुध्दि थोडी घडेना पारायण एका भावें भजावा नारायण ।
var mulen shenda khalin dise bano
वर मुळें शेंडा खालीं दिसे बानो । प्रपंची रानोरान वृक्ष बारे ॥१॥