भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेंकुरातें बाप खेळवी साचें । बाईल देखतां ती पुढें नाचे

lenkuraten bap khelavi sachen | bail dekhatan ti pudhen nache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लेंकुरातें बाप खेळवी साचें । बाईल देखतां ती पुढें नाचे ॥१॥ माझां बाप माझी आई । बाईल देखतां नाचतो पायीं ॥२॥ धडसेनी तोंडे बोबडें बोले । आवडीनें म्हणे पाहे बाइले ॥३॥ सासू सासरा पहाती साला । नाचतो जांवई घेउनी मुला ॥४॥ यापरी ममता नाचवी जन । देवद्वारीं आलीया धरी अभिमान ॥५॥ एका जनार्दनीं सांडोनी अभिमान । संतापुढें नाचें धरूनियां कान ॥६॥