भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी

lenkara levavi mata alankar | nahin antapar avadisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥१॥ कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥ आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥ पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि आस असावें हें ॥३॥ मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघें गंगा काई परतों जाणे ॥४॥ तुका म्हणे कोठें उदार मेघां शक्ती । माझी तृषा किती चातकाची ॥५॥