भजनी मालिका
← भजनांकडे परत

लुगडया नांव चंद्रकळा । परी तो काळा रंग वरी

lugadaya nanv chandrakala | pari to kala rang vari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लुगडया नांव चंद्रकळा । परी तो काळा रंग वरी ॥१॥ नांवा ऐसें कर्तृत्व नाहीं । तरी तें कायी नपुसंक ॥२॥ घोळण्या नांव लक्षुमण । करितें भर्जन लाहयांचें ॥३॥ निळा म्हणे घुसळिती रवी । परी ते न दावी प्रकाश ॥४॥