भजनी मालिका
← भजनांकडे परत

लिहिलें संचितीं न चुके कल्पांतीं । वायां कुंथाकुंथीं करूनी काय

lihilen sanchitin na chuke kalpantin | vayan kunthakunthin karuni kay

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
लिहिलें संचितीं न चुके कल्पांतीं । वायां कुंथाकुंथीं करूनी काय ॥१॥ जन्ममरण सुखदु:खाचें गांठोडें । हें तों मागें पुढें बांधलेंसे ॥२॥ निढळींची अक्षरे साच तेचि खरे । आतां वोरबार करील कोण ॥३॥ चोखा म्हणे आमुची जैशी कां वासना । तैशीच भावना होत जात ॥४॥