भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावोनि भवभयें तुवां केलेंज साचें । देह नव्हे याचें ऐसें केलें

lavoni bhavabhayen tuvan kelenj sachen | deh navhe yachen aisen kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लावोनि भवभयें तुवां केलेंज साचें । देह नव्हे याचें ऐसें केलें ॥१॥ सुखभोग सर्व दिला टाकोनियां । नेणें तुझ्या पायांपरतें कांहीं ॥२॥ ऐसें काय केलें नामया चाळविलें । समूळ बुडविलें अपणांमाजीं ॥३॥ आम्हां दुर्बळांचा करोनियां घात । केला वाताहात घराचार ॥४॥ आतां तुजविण कोणाचें साउली । पाळली पोसिली तुझी देवा ॥५॥ संकटीं उदरीं वाहिली म्यां आशा । होता भरंवसा थोर याचा ॥६॥ तंव तुवां लाविला आपुलिया सवें । नव्हे मज कांहीं ऐसा केला ॥७॥ काया वाचा मनें सांडोनियां मज । अनुसरला तुज मनोभावें ॥८॥ नकळे तुझी माव काय या दाविलें । परतेनासें केलें चित्त याचें ॥९॥ आतां माझा शीण निवारिल कोण । एका तुजविण पांडुरंगा ॥१०॥ गोणाई म्हणे देवा देई जीवदान । सुखाचें निधान नामा माझा ॥११॥