भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तोचि खरा

latikyachen anvatanen jeviliya sach | kay tya vishvas tochi khara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तोचि खरा ॥१॥ कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥ जळमंडप्याचे घोडे राउत नाचती । ते काय तगती युद्धालागीं ॥२॥ तुका म्हणे तैसें मतवादीयांचें जिणें । दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥३॥