भजनी मालिका
← भजनांकडे परत

लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चि-न्हांचा

lambodara tujha shobhe shundadand | karitase khand dushchi-nhancha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चि-न्हांचा ॥१॥ चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥ भव्यरूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसें ॥३॥ तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ॥४॥ चौदा विद्या तुझे कृपेनें येतील । मुके बोलतील वेदघोष ॥५॥ रूणझुण पायीं वाजताती वाळे । ऐकोनी भुललें मन माझें ॥६॥ भक्तवत्सला एकें पार्वतीनंदना । नमन चरणां करितसें ॥७॥ नामा ह्मणे आतां देईं मज स्फूर्ती । वर्णितसें कीर्ति कृष्णजीची ॥८॥