भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिक्याचे वाणी वचनाचा संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत

latikyache vani vachanacha sanvad | nanhin konan vad ruchon yet

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिक्याचे वाणी वचनाचा संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥ अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥२॥ तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥३॥