भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिकें तें रुचे । साच कोणां ही न पचे

latiken ten ruche | sach konan hi na pache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिकें तें रुचे । साच कोणां ही न पचे ॥१॥ ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येईल सीण ॥ध्रु.॥ वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥२॥ कांहीं न मनी माकड । तुका उपदेश हेकड ॥३॥