भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिक्या भावाचें । देवपण नाहीं साचें

latikya bhavachen | devapan nahin sachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लटिक्या भावाचें । देवपण नाहीं साचें ॥१॥ भाव नाहीं जेथें अंगी । देव पाहतां न दिसे जगीं ॥२॥ सर्व काळ मनीं कुभाव । जैसा पाहे तैसा देव ॥३॥ लटिकी भंड फजिती । एका जनार्दनीं निश्चिती ॥४॥