भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिका तरी गाईन तुझेंचि नाम । लटिकें प्रेम आणीन तुझें

latika tari gain tujhenchi nam | latiken prem anin tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लटिका तरी गाईन तुझेंचि नाम । लटिकें प्रेम आणीन तुझें ॥१॥ सहजचि लटिकें असे माझें ठायीं । तुझिया पालट नाहीं साचपण ॥२॥ लटिकें तरी हरी करी तुझें ध्यान । लटिकें माझें मन तुजचि चिंती ॥३॥ लटिकें तरी बैसे संतांचें संगतीं । दृढ धरीन चित्तीं नाम तुझें ॥४॥ लटिका तरी तुझा म्हणविन दास । धरीन विश्वास नामीं तुझें ॥५॥ लटिकें माझें मन सुफळ करी देवा । नामा म्हणे केशवा विनती माझी ॥६॥