भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाहीं

latiken ten dnyan latiken te dhyan | jari harikirtan priy nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥ लटिका चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाठी ॥ध्रु.॥ लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥२॥ लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥ नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥ तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥५॥