भजनी मालिका

भजने

रामें रावण रणीं । निवटिला निजबोध वाणीं । येर सर्वस्व मानुनी । निज सुखीं जाहला ॥१॥ दहा मुखांते छेदिलें । शेखीं विश्वमुखें केलें । रणीं रामें सुख दिधलें । परम सुख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राया जाणविती सेवक । अक्रूरें आणिला नंदबाळक । तेणं मर्दुनी बळिया रजक । धनुर्यागही भंगिला ॥१॥ आतां येऊनियां चौबारी । उभा रंगशिळेवरी । अवघ्या पाहाती नगरनारी । लोकपरिवारीं मिळोली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रावण म्हणे नवल चोज । माझें कटक पारखे मज । अश्व आणि नर गज । रामजी स्वयें ॥१॥ निशाचर वीर । राम बाणले साचार । रामरुप वानर । सरसावले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रावणें हें केलें लग्नामाजी विघ्न । असे कीं स्मरण तुज-लागीं ॥१॥ आणीरें धनुष्य मारीन रावणा । लंका बिभिषणा देईन मी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राष्ट्रं करी पाप राजानें भोगावें । राजियाचें तें सर्व पुरोहितां ॥१॥ बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही । परी तें को-णाही न कळे वर्म ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णी लांचावल्या आन न रिघे मनीं ॥१॥ जें जें दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रासक्रीडा खेळ खेळॊनिया श्रीहरी येती परोपरी गोकुळासी ॥१॥ न कळेची कवणा कैसें हें विंदान । वेदादिकां मौन पडिलेंसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥ तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राहा याचे तळीं आनंदें करूनी । मानूं नका मनीं भय याचें ॥१॥ पाहूं किती दिवस पडतो पाऊस । धरीन नि:शेष प्रलयांत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राहातें एक जातें दोनपणें । तेथेंचि नाहीं पां देखणें ॥१॥ एकचि एक बोलता रे साचे । एक नाहीं तेथें अनेक कैंचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ