भजनी मालिका
← भजनांकडे परत

राव म्हणे अहो ऋषि काशीखंड वाराणसी

rav mhane aho rushi kashikhand varanasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
राव म्हणे अहो ऋषि काशीखंड वाराणसी ।।१।। तेथे जाऊनियां आम्ही ऋण फेडूं तुमचे स्वामी॥२॥ एक मासाची अवधी तुम्ही द्यावी कृपानिधी ॥३॥ ऋषि म्हणे खरें बोला। नातरी शापीन तिघांला ॥४॥ रोहिदास म्हणे त्यासी गहाण राहीन तुम्हांपाशीं ॥५॥ पितृवचनाचे ऋण त्यांचा उतराई होईन । ||६|| ऋण हत्या आणि वैर। नाहीं चुकत मेल्यावर ।।७।। ऐसी बाळकाची वाणी ऐकूनि दचकला मनीं ॥८॥ ऋषि बोलला नृपासी नको राहूं आमुचे देशीं ।।९।। निधे निधे त्यासी म्हणे बाहेर आली तिघेजणें ।। १० ।। वन निघाला त्वरित। झाला लोकांचा आकांत ।। ११ ।। लोट पूर जाती पळा नेत्रीं उदक ढळढळां ।। १२ ।। कैसा ब्राह्मण पहा हो। नृपचंद्रालागीं राहो।।१३।। राजा बाहेर दवडूनी पाहे आमुचाचि धणी ।।१४।। नगरलोकांसी फिरवुनी । राव निघाला तेथुनी ।।१५।। अलंकार देखियेला मार्गे विश्वामित्र आला ।। १६ ।। माझ्या राज्यांतील संपत्ती। तारामती धरिली हातीं । । १७।। घेई भूषण उतरोनि। म्हणे नामयाची जनी ।। १८ ।।