भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामेश्वरभट्टें ऐकिला वृत्तान्त

rameshvarabhatten aikila vruttanta

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
रामेश्वरभट्टें ऐकिला वृत्तान्त । धांवोनी त्वरीत तेथ आला ॥ १ ॥ तुकोबाचें तींहीं घेतलें दर्शन । गाय तेही पूर्ण पाहियेली ॥ २ ॥ दोहीचे पाठीचा दिसे एक भाव । रुदनीं ते सर्व प्रवर्तले ॥ ३ ॥ तुकोबाचे पार वर्णिलासा कोण । कलियुगीं जाण प्रल्हाद हा ॥ ४ ॥ सर्वांतर साक्षी करोनीया स्तुती । स्वमुखें रमती आपुलिया ॥ ५ ॥ बहिणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥ ६ ॥