भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहातें एक जातें दोनपणें । तेथेंचि नाहीं पां देखणें

rahaten ek jaten donapanen | tethenchi nahin pan dekhanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राहातें एक जातें दोनपणें । तेथेंचि नाहीं पां देखणें ॥१॥ एकचि एक बोलता रे साचे । एक नाहीं तेथें अनेक कैंचे ॥२॥ अनेकी एक निर्धारितां पाहीं । मुळीं मन ठेवुनियां ठायीं ॥३॥ राहातें जातें दोन्हींही वाव । एका जनार्दनीं एकचि भाव ॥४॥