भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामानाम वदतां वाचे । सुकृत जोडे पैं पुण्याचें

ramanam vadatan vache | sukrut jode pain punyachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामानाम वदतां वाचे । सुकृत जोडे पैं पुण्याचें ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमानिगमां ॥२॥ नामें तारिलें पातकी । वंद्य जाहले तिहीं लोकीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम । सुखा चैतन्य निजधाम ॥४॥