भजनी मालिका

भजने

रामनामीं भाव न धरिती कोणी । नाना मंत्र तंत्र घेती जनीं । सकुडी कुंटणी वैकुंठासी नेली । अवचटें राम वदनीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

रामनामें गणिका नेली वैकुंठासी । कलीमाजीं जनांसी तारक हेंची ॥१॥ म्हणोनि आळस न करा वाचे । उच्चारण नामाचें करा वेंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामनामे जो धरी भाव । तया सुलभ उपाव । नामस्मरणीं जीव । सदोदित जयाचा ॥१॥ तेणें सधिलें साधन । आभ्यासिला हो पवन । अष्टांग योग साधून । लय लक्ष दिधलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामनामें तृप्त जे नर जाहले । पुनरावृत्ती न आले संसारासी ॥१॥ जाणार जाणार सर्व हें जाणार । रामनाम साचार जप करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामनामें नामरुपा निरास । कृष्णकर्म स्मरतां कर्माचा ग्रास ॥१॥ नामें जिव्हां गर्जत अहर्निशीं । भवभव तें बापुडें परदेशीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामनामें नित्य जयासी आनंद । तया ठायीं भेदाभेद नुमटती ॥१॥ ऐसे जें रंगले रामनामी नर । चुकवी यमप्रहार जन्मो जन्मीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामनामेंसुख अत्यंत जें आहे । म्हणोनि मना ध्याये नित्य नाम ॥१॥ सुखाचिया गोडी जया नाहीं ठावीं । ते ते नर असोनिया देहीं प्रेतवत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामभजन सब सार मिठाई । हरी संताप जनमदुख राई ॥ध्रु.॥ दुधभात घृत साकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥ कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम