भजनी मालिका
← भजनांकडे परत

रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण

rasabh dhutala maha tirthammaji | navhe jaisa teji shamakarna

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥ तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥ सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥२॥ तुका म्हणे श्वाना क्षिरीचें भोजन । सवें चि वमन जेवी तया ॥३॥