भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहा याचे तळीं आनंदें करूनी । मानूं नका मनीं भय याचें

raha yache talin ananden karuni | manun naka manin bhay yachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राहा याचे तळीं आनंदें करूनी । मानूं नका मनीं भय याचें ॥१॥ पाहूं किती दिवस पडतो पाऊस । धरीन नि:शेष प्रलयांत ॥२॥ सांगतांचि ऐसें राहाती सकळ । वर्णिताती बळ परस्परें ॥३॥ सौंगडे म्हणती तेव्हां ते समस्त । लावीं कीरे हात सकळीक ॥४॥ उगेची श्रमती बालकें अज्ञान । ह्मणे नारायण काढा हात ॥५॥ सप्त दीन होती सांगतो योगीद्रं । पाहावया इंद्र येता झाला ॥६॥ अद्‍भुत चरित्र पाहून गेली भ्रांत । मेघासी सांगत पुरे करा ॥७॥ नामा ह्मणे इंद्र चित्तीं चिंतावला । अपराध घडला समर्थाचा ॥८॥