भजनी मालिका
← भजनांकडे परत

रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक

rayachen sevak | sevatichen pidi rank

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥१॥ हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥ परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥ तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी॥३॥