भजनी मालिका

भजने

देवा तूं आमचा कृपाळ । भक्तीप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु। जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥ शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवा तूं जया होसी प्रसन्न । तया नलगे कर्मबंधन । निकें म्हणती सकळ जन । नीच लोक वंदिती ॥१॥ तुझी दृष्टी कृपा-वंता । जयावरी पडे अनाथनाथा । तया न बाधी संसारव्यथा । सर्वस्व त्याचें हरीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी । कमठे पाठीं न संडी कैसी । मर्में कावाविसी केलेंज तुज ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तूं प्रथम गर्भबास भोगिसी । सागरीं जळचरु मत्स्य झालासी । कमठ पाठी नसंडी कैसी । कूर्में कासाविसी केलें तुज ॥१॥ अपवित्र नाम आदि वराह । याहूनि थोर कुर्म कांसव । अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठायी ॥१॥ डोळियाचा डोळा दृष्‍टीच भासला । देव प्रकाशला आदि अंतीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठाई ॥१॥ निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेच ठाई ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

देवा निढळावरी हात दोन्ही । पाहें चक्रपाणि वाट तुझी ॥१॥ धांव गा धांव सख्या पांडुरंगा । जीवीं जिवलगा मायबापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥ नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा पाप छळें कांपते मेदिनी । षट्‍कर्में ब्राह्मणीं सांडियेलीं । दैत्यांचेनि भारें दाटली अवनी । प्रथम चरणीं कलि-युगीं ॥१॥ लटिक्याचा साच जिंकियेला कली । पाखांडी वेदातें न मानिती बळी । अधर्म प्रवर्तला महीतळीं । ऐसीं पापें कळीं थोर झालीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥ होणार तें हो गा सुखें पंढरीनाथा । कासया शिणतां वायांविण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥ फुकाचा कामारा वोळगे निरंतर । न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा माझें मन ठेवीं तुझे चरणीं । घालीं माझें नयनीं रूप तुझें ॥१॥ मज या लोकांचा शीण असे मनांत । तुजचि चिंतित ह्रदयकमळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव