भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा पाप छळें कांपते मेदिनी । षट्‍कर्में ब्राह्मणीं सांडियेलीं । दैत्यांचेनि भारें दाटली अवनी । प्रथम चरणीं कलि-युगीं

deva pap chhalen kampate medini | shat‍karmen brahmanin sandiyelin | daityancheni bharen datali avani | pratham charanin kali-yugin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा पाप छळें कांपते मेदिनी । षट्‍कर्में ब्राह्मणीं सांडियेलीं । दैत्यांचेनि भारें दाटली अवनी । प्रथम चरणीं कलि-युगीं ॥१॥ लटिक्याचा साच जिंकियेला कली । पाखांडी वेदातें न मानिती बळी । अधर्म प्रवर्तला महीतळीं । ऐसीं पापें कळीं थोर झालीं ॥२॥ ह्मणोनि करुणा भाकितु आहे । जैसी व्याघ्रें वेढिली गाय । तेंवि पंचानन प्रासूं पाहे । तैसा दिसतो नारायणा ॥३॥ भक्ति भावो नावडे पैं गा । जैसें कां अमृत मुखीं भुजंगा । डंख करूं आवडे जगां । ऐसें श्रीरंगा नवल चोज ॥४॥ भ्रतारभीक्त सोडियली नारीं । परपुरुषीं मन निर्धारीं । पितियासि पुत्र असों नेदी घरीं । नित्य निंदा करी रे अपमान ॥५॥ म्हणोनियां जिबें त्रासु घेतला । सत्य लोपलें धर्म बुडाला । अझूनि काय पाहतोसि उगला । धांवें विठ्ला म्हणे नामा ॥६॥