भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तूं जया होसी प्रसन्न । तया नलगे कर्मबंधन । निकें म्हणती सकळ जन । नीच लोक वंदिती

deva tun jaya hosi prasanna | taya nalage karmabandhan | niken mhanati sakal jan | nich lok vanditi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा तूं जया होसी प्रसन्न । तया नलगे कर्मबंधन । निकें म्हणती सकळ जन । नीच लोक वंदिती ॥१॥ तुझी दृष्टी कृपा-वंता । जयावरी पडे अनाथनाथा । तया न बाधी संसारव्यथा । सर्वस्व त्याचें हरीसी ॥२॥ माती धरिल्या होय कनक । भोग भोगिती परममूर्ख । नाढळती महादोष । मुखीं नाम गर्जतां ॥३॥ धन्य धन्य ते संसारीं । पुरुष अथवा हो नारी । दरिद्र नाहीं त्यांचे घरीं । तूं श्रीहरी सानुकुळ झालिया ॥४॥ ऋद्धि सिद्धि द्वारीं वोळं-गती । वैरी दास्यत्व करिती । विषें अमृतें होती । तूं श्रीपति सानु-कुल झालिया ॥५॥ येथूनि नेसील परतें । नामा ह्मणे वैकुंठातें । लक्षा नये चहूं वेदां तें । नाना मतें धुंडाळितां ॥६॥