भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना

deva majhen man karoni svadhin | nimole svamipan bhogisina

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥ फुकाचा कामारा वोळगे निरंतर । न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥ तुज नलगे देणें मज नलगे मागणें । असेन अनुसंधानें चरणाचेनि ॥३॥ नामा म्हणे केशवा तूं सर्व जाणता । समयींच्या उचिता चुकों नको ॥४॥