भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठायी

deva nahin rup deva nahin nam | dev ha nishkam sarvanthayi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठायी ॥१॥ डोळियाचा डोळा दृष्‍टीच भासला । देव प्रकाशला आदि अंतीं ॥२॥ नवल वाटलें नवल वाटलें । देव कोंदाटले मागें पुढें ॥३॥ चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देव प्रगटला देहामाजी ॥४॥