भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा

deva panduranga vasudeva hari | govind murari nara-yana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥ नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥ रावणारि होसी जानकी टाकुनी । हिंडसी अंगणीं अर्जुनाच्या ॥३॥ अर्जुनाच्या घरीं अंगें घोदे धुसी । लज्जा द्रोप-दीची राखियेली ॥४॥ राखशील द्वार भक्ति बळिवंता । नामा ह्मणे आतां काय सांगूं ॥५॥