भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा निढळावरी हात दोन्ही । पाहें चक्रपाणि वाट तुझी

deva nidhalavari hat donhi | pahen chakrapani vat tujhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा निढळावरी हात दोन्ही । पाहें चक्रपाणि वाट तुझी ॥१॥ धांव गा धांव सख्या पांडुरंगा । जीवीं जिवलगा मायबापा ॥२॥ तुजविण ओस दिसती दाही दिशा । आणि धांव जगदीशा मजसाठीं ॥३॥ नामा म्हणे काय बैसलों निवांत । धांवतो अनंत भक्तांसाठीं ॥४॥