भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवां भक्तां भिन्नपण । देखती जन मूर्ख ते

devan bhaktan bhinnapan | dekhati jan murkha te

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देवां भक्तां भिन्नपण । देखती जन मूर्ख ते ॥१॥ सविता तोचि नारायण । वेदप्रमाण हा अर्थ ॥२॥ व्यासोनारायण म्हणती । मिथ्या वदंती हें काय ॥३॥ निळा म्हणे अर्जुन कृष्ण । नरनारायण भिन्न तनु ॥४॥