भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठाई

deva nahin rup deva nahin nam | dev ha nishkam sarvanthai

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठाई ॥१॥ निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेच ठाई ॥२॥ चोखा म्हणे पाहतां पाहणें लपावे । ह्रदयीं बिंबले ह्रदयचि ॥३॥