भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तूं प्रथम गर्भबास भोगिसी । सागरीं जळचरु मत्स्य झालासी । कमठ पाठी नसंडी कैसी । कूर्में कासाविसी केलें तुज

deva tun pratham garbhabas bhogisi | sagarin jalacharu matsya jhalasi | kamath pathi nasandi kaisi | kurmen kasavisi kelen tuj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा तूं प्रथम गर्भबास भोगिसी । सागरीं जळचरु मत्स्य झालासी । कमठ पाठी नसंडी कैसी । कूर्में कासाविसी केलें तुज ॥१॥ अपवित्र नाम आदि वराह । याहूनि थोर कुर्म कांसव । अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥ खुजेपणें बळिस पाताळीं घातलें । तेणें कर्में तयाचें द्बार रक्षिलें । पितयाचे वचनें मातेसी वधिलें । तें कर्म जडलें परशुरामा ॥३॥ श्रीरामा झाल्या आपदा बहुता । कर्में भोगविलें अंतरली सीता । भाल्लुका तिर्थीं बधियलें अवचिता । नाम अच्युता तुज झालें ॥४॥ ऐसा कष्टि होऊनि बौद्ध राहिलासी । तूम कलंकिया लोकां मारिसी । आपुल्या दोषासाठीं आणिकं दंडिसी । निषकळंक होसी नारायणा ॥५॥ ऐसा तूं बहुत दोशी बांधिलासी । पुढिलचि जन्में अवगतोसी । विष्णु-दास नामा म्हणे ह्लषिकेशी । तुझी भीड कायेसी स्वामियाहो ॥६॥