भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी

deva majhen man ani tujhe charan | ekatra karon didhali ganthi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥ होणार तें हो गा सुखें पंढरीनाथा । कासया शिणतां वायांविण ॥२॥ माझिया अदृष्टीं ऐसेंचि पैं आहे । सेवावे तुझे पाय जन्मोजन्मीं ॥३॥ असतां निरंतर येणें अनुसंधानें । प्रारब्ध भोगणें गोड वाटे ॥४॥ ह्रदयीं तुझें रूप वदनीं तुझें नाम । बुद्धि हे निष्काम धरिली देवा ॥५॥ नामा म्हणे तुझीं पाउलें चिंतितां । जाली कृतकृत्यता जन्मोजन्मीं ॥६॥