भजनी मालिका

भजने

कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित्त निरंतर ॥१॥ माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा ॥१॥ भाजन घडणें राहिलें सर्वथा । पडियेली चिंता अन्नवस्त्रा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥ नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥ कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय अपराध पाहसी कोणाचे । धांवे भावकांचे कामकाजीं ॥१॥ काय केशिराजा वाणूंज मी दुबळें । शरणागता लळे पुरविशी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥ माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥ लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आम्हापाशीं आहे धन वित्त । दान तें उचित देऊं काय ॥१॥ देतां घेतां आम्हां पुरे पुरे जालें । संगतीं त्यागिलें भिवोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय आम्हीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥१॥ हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आम्ही भक्ती करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥१॥ कसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आह्मीं आतां पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण ॥१॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥ ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय उणें कां करीतोसी चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी । परेपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

काय उणें झालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम