भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय आह्मीं आतां पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण

kay ahmin atan pot chi bharaven | jag chalavaven bhakta hmun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय आह्मीं आतां पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण ॥१॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥ काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥२॥ तुका म्हणे काय गुंफोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥३॥