भजनी मालिका

भजने

काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥१॥ पडिलें हें दिसे ब्रम्हांड चि वोस । दाटोनि उछ्ववास राहातसे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी ॥१॥ ऐशा संकल्पाच्या संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥१॥ हिरोनियां नेला मुखींचा उच्चार । पडिलें अंतर जवळी च ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा । करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥१॥ अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं सांगतांही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो ॥१॥ मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय कामा पुत्र कोणा आले जाणा । शेखीं त्या रावणा काय झालें ॥१॥ महादुष्टें शंखासुरें नेले वेद । शेवटीं गोविंदें सोडविले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । नेऊं पतना आदरिलें ॥१॥ भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कटपट । घात बळकट मांडियेला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥ मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय कृपेविण घालावें सांकडें । निंश्चिती निवाडें कोण्या एका ॥१॥ आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय केलें मागें कोणाचें तूं बरें । शेवटीं वान्नरें संग करी तें ॥१॥ संगें करूनियां हिंडे रानोरान । दशरथा खूण चुकविसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव