भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा

kamachiya ashen ghadala prakar | rahila vevhar prapanchacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा ॥१॥ भाजन घडणें राहिलें सर्वथा । पडियेली चिंता अन्नवस्त्रा ॥२॥ उदरानिमित्त कष्ट बहु करिती । निर्भय तो चित्तीं असे गोरा ॥३॥ एका जनार्दनीं न सोडीच भजन । पाहूनि नारायण काय करी ॥४॥