भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप

kay atan yasi mhanaven lenkarun | jagacha ha guru mayabap

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥ माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥ क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥३॥ करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥४॥ तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥